पर्यटन स्थळ

सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर मोठी प्रसिद्ध आहे. जे अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव दत्तपरंपरेतील भाविकांकरता अत्यंत पवित्र ठिकाण आहे. ब्रह्मपुरी या धार्मिक गावी मंगळवेढा या तालुक्यात येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पंढरपूर देशातील प्रमुख तीर्थ क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. येथे महाराष्ट्रातील दैवत विठ्ठल रुख्माईचे मंदिर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात. सिध्देश्वर हे सोलापुर नगरीचे ग्रामदैवत असुन या मंदिराची निर्मीती […]

Continue reading

वाहतूक व्यवस्था

सोलापूर मध्ये रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या खूप जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 4 प्रमुख महामार्ग जातात. सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.

Continue reading

नद्या

सोलापूर मध्ये भीमा, सीना, नीरा व माण या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असलेली भीमा ही जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी मानली जाते. ह्या सर्व नद्या या जिल्हा मधून वाहतात. सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे.

Continue reading

जंगली प्राणी व पक्षी

सोलापूर शहरात कंबर तलाव या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारची पशु पक्षी प्राणी हे पहावयास मिळतात. येथे सिंह, बिबट्या, मगर, माकडे, काळविट व हरणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. हा एक स्तलंतरित पक्षी आहे.माळढोक पक्षी अभयारण्य आहे. हा पक्षी या अभयारण्य मध्ये पाहायला मिळतो.

Continue reading

व्यवसाय व उद्योग

सोलापूर येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. जास्तीत जास्त शेती हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. 1990 मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब, बोर या पिकांसह आंबा, सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधिक होत आहे. मोहोळ, पंढरपूर तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची […]

Continue reading

इतिहास

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स. पूर्व 200 वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या आहेत. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत. पहिल्या […]

Continue reading

भाषा

मराठी भाषकांची संख्याही या जिल्ह्यात जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चार शैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा सर्व भाषांत सहजतेने बोलताना आढळतात. येथे लिंगायत, मराठा व धनगर जातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. बंजारा तांड्यामध्ये राहतात.

Continue reading

सोलापूर जिल्ह्याचे हवामान

सोलापूर या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान 40॰ ते 42॰ पर्यंत जाते. हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण 600 ते 700 मि. मी इतके कमी आहे. तसेच हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात थंडी असते.

Continue reading

लोकसंख्या

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 43,15,527 एवढी आहे. या राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 2% आहे. तर 1000 पुरूषांमागे स्त्रियांची संख्या 935 आहे. सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. तसेच आंध्र प्रदेश हे राज्यही सोलापूर जिल्ह्याला जवळ आहे. धनगर भाषिक लोकांची संख्या येथे लक्षणीय आहे.

Continue reading

क्षेत्रफळ व विस्तार

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,886 चौरस किलोमीटर एवढे आहे. या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा तसेच पूर्वेला उस्मानाबाद जिल्हा व पश्चिमेस सातारा जिल्हा दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे.

Continue reading