व्यवसाय व उद्योग

सोलापूर येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. जास्तीत जास्त शेती हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. 1990 मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली.

डाळिंब, बोर या पिकांसह आंबा, सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधिक होत आहे.

मोहोळ, पंढरपूर तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे 1933 पासून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे.

सोलापूर औद्यागिकदृष्ट्याही विकसित होत आहे. जिल्ह्यात सोलापूर चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध होता. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्स भारतभर प्रसिद्ध आहेत. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात.

काही कंपन्या आपल्या मालाची 100% निर्यातही करतात. सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर समाजाचा मोठा वाटा आहे. रसायन निर्मिती उद्योग येथील वैशिष्ट्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *