सोलापुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती

  • लोकसंख्या 43,17,756
  • एकुण क्षेत्रफळ 14895 वर्ग कि.मी.
  • एकुण गावं 1144
  • एकुण तालुके 11
  • साक्षरतेचे प्रमाण 2%
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांची संख्या 935
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 65, 52, 204, 361, 465, 150 या जिल्हयातुन गेले आहेत.
  • सोलापुर जिल्हयाच्या उत्तरेला अहमदनगर पुर्वेला उस्मानाबाद दक्षिणेला सांगली विजापुर तर पश्चिमेला सातारा आणि पुणे हे जिल्हे आहेत.
  • स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच या शहराने तिन दिवसाचे स्वातंत्र्य उपभोगले आहे ते 1930 साली 9,10 आणि 11 मे ला मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या स्वातंत्र्यविरांना इंग्रजांनी सोलापुरात फाशी दिली होती त्यामुळे या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणुन देखील ओळख आहे.
  • अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत ’पंढरपुर’ याच जिल्हयात असुन या जिल्हयाला संतांची भुमी देखील म्हंटले आहे.
  • पंढरपुरला फक्त महाराष्ट्रातीलच नव्हें तर दक्षिणेकडच्या राज्यातील भाविकही दर्शनाकरता येत असतात.
  • तेलगु, कन्नड आणि मराठी अश्या तिनही भाषा बोलणारे नागरिक गुण्या गोविंदाने याच जिल्हयात नांदतांना आपल्याला पहायला मिळते.
  • अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाकरता भाविक लांबुन या ठिकाणी येतात शिवाय येथील शिवगंगा मातेचे मंदिर त्याच्या कळसामुळे फार प्रसीध्द आहे या मंदिराचा कळस 100 तोळे सोन्यापासुन बनला असुन दरवाजा 80 किलो चांदिपासुन बनल्याचे सांगितल्या जाते.
  • सोलापुर जिल्हयात दरवर्षी साजरी होणारी सिध्देश्वराची यात्रा खुप प्रसिध्द आहे.
  • या जिल्हयातील ’सोलापुरी चादरी’ प्रसिध्द आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *