पर्यटन स्थळ

सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर मोठी प्रसिद्ध आहे. जे अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव दत्तपरंपरेतील भाविकांकरता अत्यंत पवित्र ठिकाण आहे.

ब्रह्मपुरी या धार्मिक गावी मंगळवेढा या तालुक्यात येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

पंढरपूर देशातील प्रमुख तीर्थ क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. येथे महाराष्ट्रातील दैवत विठ्ठल रुख्माईचे मंदिर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात.

सिध्देश्वर हे सोलापुर नगरीचे ग्रामदैवत असुन या मंदिराची निर्मीती योगी श्री सिध्दरामेश्वर यांनी केली आहे. जवळजवळ 68 शिवलिंगांची त्यांनी स्थापना केली. सोलापुरचे सिध्देश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर असुन अनेक शिवलिंगांचे दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येते. श्री गणेशाची मुर्ती देखील या ठिकाणी आहे.

महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. दत्तात्रयाचे नृसिंह सरस्वती अवतारातील हे गाणगापुर ठिकाण अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणुन प्रसिध्द आहे. करमाड या ठिकाणी भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर लोकप्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *