इतिहास

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स. पूर्व 200 वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या आहेत.

यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला.

सोलापूरलाही जानेवारी,1920 मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अनुभूत घटना सोलापूरच्या इतिहासात घडली ते म्हणजे मे 1930 मध्ये ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात मध्ये प्रक्षुब्ध झालेल्या जनतेला शहरातील पोलिस व इंग्रज अधिकाऱ्यांना पळून लावले व तीन दिवस जिल्ह्यात कारभार सांभाळला.

चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णाची व गोरगरिबांचे सेवा करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस ते या आंतरराष्ट्रीय आदर्श वेक्ती सोलापुरात होते. स्वतंत्र चळवळीच्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यामध्ये सर्वात पुढे सोलापूर जिल्हा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *